मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर बोहल्यावर चढून काहीच दिवस झाले आहेत, असं त्याच्या चाहत्यांना वाटतं. मात्र शाहिद कपूरच्या घरी लवकरच गोड बातमी येण्याची शक्यता आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा प्रेग्नंट असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं.

 
मीरा राजपूतने 2 एप्रिलला पती शाहिदसोबत लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. यावेळी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर तिने परिधान केला होता. तेव्हा मीराचे 'बेबी बम्प' दिसल्याचे संकेत मिळत आहेत.

 
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने 4 एप्रिलला इन्स्टाग्रामवर दोघींचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये #Repost @mira.kapoor with @repostapp. ・・・ Two M's and a Bum #sayheytobey - little M (दोन एम आणि एक बम, लिटल 'एम'ला हेल्लो करा) असं मसाबाने फोटोखाली लिहिलं आहे.

 
यातील मेख अशी की मसाबा आणि मीरा दोघींचंही नाव 'एम'वरुन सुरु होत असल्यामुळे नक्की कोणाचं बेबी बम हे स्पष्ट होत नाही.
शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.