Salman Khan & Pooja Hegde :  बॉलिवूडचा भाईजान आशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.सध्या एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत सलमान खानचं नाव जोडलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही सध्या सलमान खानला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या नात्याबाद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


उमैर संधू यानं शेअर केलेल्या ट्वीटमुळे सलमान आणि पूजाच्या सोशल मीडियावर  नात्याबाबत चर्चा सुरु झाली. उमैरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'ब्रेकिंग न्युज, न्यु कपल इद टाऊन, मेगास्टार सलमान खान हा पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे.' उमैर संधूच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 






'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच काही आगामी चित्रपटांमधून पूजा आणि सलमान हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 


Salman Khan Upcoming Movies : सलमानचे आगामी चित्रपट 


सलमान हा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच  किक-2 आणि नो एंन्ट्री या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटामध्ये एक छोटी भूमिका साकारणार आहे. सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


Pooja Hegde Upcoming Movies : पूजाचे आगामी चित्रपट


पूजा ही रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  पूजाच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं हृतिक रोशनच्या मोहनजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्पण केलं पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिनं हाऊसफुल-4 मध्ये प्रमुख भूमिका साकारली. तिच्या दुवदा जगन्नाथम, साक्षीम,  बीस्ट, मुगामुदी या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Salman Khan : 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली; भाईजानकडून खास पोस्ट शेअर