मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री पाठवण्यात आली आहे. मात्र न्यूटनच्या निवडीमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिरमुसल्याचं म्हटलं जात आहे. पहिली मराठी निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटर चित्रपटाला डावलल्यामुळे प्रियंका आणि तिची आई मधु चोप्रा नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेल्या प्रियंका चोप्राने गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी पुरस्काराच्या नामांकनामध्ये आपलं नाव असेल, अशी अपेक्षा तिला होती. मात्र न्यूटनला अधिकृत प्रवेशिका म्हणून भारतातर्फे पाठवल्याने प्रियंकाचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जातं.
व्हेंटिलेटर चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म फेस्टीव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यामुळे प्रियंका आणि मधू चोप्रांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ऑस्करसाठी भारतातर्फे प्रवेशिका निवडणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडे यावर्षी 26 चित्रपट पाठवण्यात आले होते. त्यामध्ये न्यूटन, व्हेंटिलेटर यासारख्या चित्रपटांचा समावेश होता.
ऑस्करसाठी निवड झाल्यास व्हेंटिलेटरचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं प्रमोशन करावं, याची तयारीही प्रियंकाने केली होती. व्हेंटिलेटर हा चित्रपट राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2017 04:07 PM (IST)
व्हेंटिलेटर चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म फेस्टीव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यामुळे प्रियंका आणि मधू चोप्रांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -