मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इरफान आजारी असल्यामुळे सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल भारद्वाजने दिली होती. त्याचवेळी त्याच्या प्रकृतीबाबत विविध तर्क लावले जात होते. मात्र अखेर त्याने स्वतःच याबाबत मौन सोडलं आहे.


एका अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासल्याची माहिती इरफान खानने दिली आहे. या आजारावर उपचार सुरु असल्याचं त्याने सोशल मीडियाद्वारे कळवलं आहे.



इरफान खानची पोस्ट

''कधी कधी आयुष्य तुम्हाला असा धक्का देतं की त्यामुळे तुम्ही हैराण होता. गेल्या 15 दिवसांपासून माझंही आयुष्य एक सस्पेंस स्टोरी झालं आहे. मला माहित नव्हतं, की दुर्मिळ कहाण्यांची माझी शोधमोहिम मला एक दिवस दुर्धर आजारापर्यंत नेईल. मी कधीही माझ्या निर्णय आणि आव्हानांसमोर हार पत्करली नाही. त्यामुळेच या परिस्थितीलाही तोंड देईल. या कठीण वेळेत माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्यासोबत आहे. सर्वांना विनंती आहे, की कुणीही प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये. डॉक्टर या आजाराच्या निष्कर्षापर्यंत पोहचतील तेव्हा पुढच्या 10 दिवसात मी स्वतःच याबाबत माहिती देईन'' अशी पोस्ट इरफानने लिहिली आहे.

इरफान खान ब्लॅकमेल या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला असून हा सिनेमा 6 एप्रिल रोजी रिलीज होईल.

'ब्लॅकमेल'चा ट्रेलर :