मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर तिची सावत्र मुलं, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर धीराने कुटुंबासोबत राहिले. श्रीदेवीबद्दलचा तिरस्कार विसरुन हे दोघे प्रत्येक क्षण वडिलांसोबत उपस्थित होते. त्यांच्या या कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं.

पण याचवेळी सोशल मीडियावर अर्जुन आणि अंशुलाच्या चाहत्यांनी जान्हवी तसंच खुशी कपूर यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यामुळे नाराज झालेल्या अंशुला कपूरने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, अशा शब्दात तिने टीकाकांना सुनावलं.

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या एका फॅनने त्याच्या सावत्र बहिणींवर टीका केली होती. अर्जुनची सख्खी बहिण अंशुलाची नजर या कमेंटवर गेली आणि अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे ती नाराज झाली. गप्प न राहता, तिने इन्स्टाग्रावर या ट्रोलरला उत्तर दिलंच, पण त्याची कमेंटही हटवली.

तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही अशाप्रकारच्या अपमानजनक भाषेचा वापर करु नका, विशेषत: माझ्या बहिणींना. हे मला आवडत नाही. त्यामुळे मी तुमची कमेंट डिलीट केली आहे. माझ्या आणि अर्जुनबाबत असलेल्या तुमच्या प्रेमासाठी आभार मानते. फक्त एक गोष्ट सुधारायची आहे. मी भारताबाहेर कधीही काम केलेलं नाही. कृपया आनंद वाटा आणि चांगलं वातावरण कायम ठेवा. प्रेमासाठी आभार.'



अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही बोनी कपूरच्या पहिल्या पत्नी मोना यांची अपत्यं आहेत. कॅन्सरमुळे 2012 मध्ये मोना यांचं निधन झालं होतं.


संबंधित बातम्या

गुगलच्या सीईओंकडून श्रीदेवींना श्रद्धांजली


'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं, बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण





प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन

लेकीची बॉलिवूडमधली ‘धडक’ पाहण्यापूर्वी ‘मॉम’ची एक्झिट

‘रुप की रानी’ श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अहोरात्र मदत करणारा भारतीय उद्योजक

गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत!

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन

श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी