इरफानच्या 'हिंदी मीडियम'चं पोस्टर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 12:55 PM (IST)
मुंबई : अभ्यासू अभिनेता म्हणून ओळख असलेल्या इरफान खानच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. 'हिंदी मीडियम' या सिनेमाचं पोस्टर इरफानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं. 12 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हिंदी मीडियम' सिनेमाचं पोस्टर अत्यंत क्रिएटिव्ह आहे. साकेत चौधरी यांचं दिग्दर्शन आणि इरफान खानसारखा तगडा अभिनेता यात आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. https://twitter.com/irrfank/status/821965819131269120 "शाळेतल्या दिवसांची आठवण झाली. 'हिंदी मीडियम'चा टीझर पोस्टर", असे इरफानने ट्विटरवर फोटो शेअर करताना म्हटले आहे. या सिनेमात इरफानसोबत आणखी एक अभिनेता असणार आहे. मात्र, दुसरा अभिनेता कोण आहे, याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. फसवणूक असो किंवा खोटं बोलणं... आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवण्यासाठी आई-वडील काहीही करु शकतात, असेही पोस्टर शेअर करताना इरफान खान म्हणाला आहे.