मुंबई : कायम वादात राहणारे बिग बॉस 10 चे स्पर्धक स्वामी ओम यांनी अभिनेता सलमान खानबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. बिग बॉसच्या घरात गोंधळ घातल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता त्यांनी बिग बॉसचा होस्ट सलमान खानबाबत वायफळ बरळले आहेत.


एड्स असल्यानेच सलमान खान लग्न करत नाही. शिवाय ही बाब तो सगळ्यांपासून लपवत आहे, असं स्वामी ओम म्हणाले. एका पत्रकार परिषदेत स्वामी ओम यांनी हा दावा केला आहे.

स्वामी ओम एकीकडे एड्स असल्याने सलमान लग्न करत नसल्याच बोलत आहेत. तर दुसरीकडे सलमानची पत्नी आणि मुलगी लंडनमध्ये राहत आहेत. याची कोणालाही माहिती नाही, असा दावा त्यांनी केला.

स्वामी ओम यांना 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढलं आहे. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली होती. याआधीही स्वामी ओम यांनी सलमान खान आणि 'बिग बॉस'वर अनेक गंभीर आरोप केले आहेत.