The Indrani Mukerjea Story: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora Murder Case) प्रकरणाची चर्चा देशभरात झाली.आता या प्रकरणावर आधारित असणारी डॉक्युमेंट्री सीरिज आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या डॉक्युमेंट्री सीरिजचं नाव 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ'(The Indrani Mukerjea Story) असं आहे. इंद्राणी मुखर्जीने तिची मुलगी शीना बोराची हत्या केली होती का? शीना बोराच्या हत्येचं सत्य काय? हे या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. नुकतीच या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...


नेटफ्लिक्सवर रिलीज होणार डॉक्युमेंट्री सीरिज (The Indrani Mukerjea Story On Netflix) 


नेटफ्लिक्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' या डॉक्युमेंट्री सीरिजचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरला कॅप्सन देण्यात आलं,"एक खळबळजनक स्कँडल ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले, ज्याच्या केंद्रस्थानी एका कुटुंबाची सर्वात गडद रहस्ये आहेत. 23 फेब्रुवारीला Netflix वर रिलीज होत आहे!"


'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' या सीरिजचे दिग्दर्शन शाना लेवी आणि उराज बहल यांनी केले आहे. या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये प्रथमच इंद्राणी, पीटर आणि राहुल मुखर्जी यांच्यातीलकॉल रेकॉर्डिंग आणि कुटुंबाची न पाहिलेली छायाचित्रे देखील दाखवली जातील, जी प्रेक्षकांना  विचार करण्यास भाग पाडतील. आता प्रेक्षक 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेत इंद्राणी मुखर्जी, तिची मुले विधी मुखर्जी आणि मिखाईल बोरा, ज्येष्ठ पत्रकार आणि वकील आहेत,  या प्रकरणाबद्दल बोलतील. इंद्राणी मुखर्जी सध्या जामिनावर बाहेर आहे.


नेमकं प्रकरण काय?


24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. शीना बोरा हत्याकांडांनंतर एका कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या जाळ्यात सारा देश अडकल्यासारखा वाटत होता. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Sheena Bora: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडावर आता वेब सीरिज येणार