indian idol 2018 : सलमान अली 10 व्या सिझनचा विजेता
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2018 04:16 PM (IST)
इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रियलिटी शोच्या 10 व्या सिझनच्या अंतिम फेरीत सलमान अलीला विजेता घोषित करण्यात आले आहे.
मुंबई : इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रियलिटी शोच्या 10 व्या सिझनच्या अंतिम फेरीत सलमान अलीला विजेता घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली. सुरुवातीपासूनच सलमान अलीने इंडियन आयडॉलमध्ये आपली छाप सोडली आहे. इंडियन आयडॉलच्या फाईनलमध्ये सलमान अलीला शानदार ट्रॉफी आणि 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. इंडियन आयडॉलच्या ग्रॅन्ड फिनालेमध्ये अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा उपस्थित होते. सलमान अलीला गायिका निलांजना रायने चांगलीच टक्कर दिली. निलांजना उपविजेती ठरली. कलाकार नितीन कुमार, सलमान अली, अंकुश भारद्वाज, निलांजना राय आणि विबोरा पराशर हे पाच स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत स्पर्धेत टिकून होते. इंडियन आयडॉलच्या दहाव्या सिझनमध्ये लाईव्ह वोटिंगच्या माध्यमातून विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले.