Rakhi Sawant First Roza : रमजानला (Ramadan) सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील उपवास ठेवत आहेत. बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंतनेदेखील (Rakhi Sawant) इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रोजा ठेवला आहे. राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका इफ्तार पार्टीत आपला उपवास सोडताना दिसत आहे.
राखी सावंतचा पहिला रोजा
राखी सावंतने 25 मार्च 2023 रोजी तिच्या घरी खास इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत तिच्या अनेक मित्र-मैत्रीणींनी हजेरी लावली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये राखी तिच्या मैत्रीणींसोबत इफ्तार पार्टीत उपवास सोडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेला दिसत आहे. राखीला उपवास करताना पाहून तिचे चाहते आनंदी झाले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तिचं कौतुक करत आहेत.
राखी सावंतने धर्म का बदलला?
राखी सावंतने म्हैसूर येथे राहणाऱ्या आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर राखीने तिचं नाव बदलून फातिमा असं ठेवलं. राखी याआधी एका मुलाखतीत म्हणाली होती की, आदिलने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असलं तरी मी रोजा पाळेल. त्यामुळेच मी उपवास ठेवला आहे.
राखीचा पती आदिल कुठे आहे?
राखी सावंतने लग्नाची जाहीर घोषणा केल्यानंतर आदिलवर मारहाण आणि फसवणूकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राखीच्या तक्रारीची दखल घेत राखीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आदिल सध्या म्हैसूर येथील पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीने तिच्या पतीवर मारहाण, फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधासारखे अनेक आरोप केले आहेत. पतीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर राखीने दुबईत अभिनय कार्यशाळा आणि डान्स क्लास सुरु केला आहे.
राखी सावंत ट्रोल (Rakhi Sawant Troll)
राखी सावंतने रोजा ठेवल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले आहे. "तुमच्या नौटंकीने कधीच समाधान वाटत नाही, नौटंकीबाज, ती कधी कधी हिंदू असते, तर कधी मुस्लिम, मला वाटतं की राखी नाटक करत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत राखीला ट्रोल केलं आहे.
संबंधित बातम्या