Adult Web Series On OTT : मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर अनेक प्रेक्षक या नव्या माध्यमाकडे वळले. कोणत्याही सेन्सॉरशिवाय उपलब्ध असणारे चित्रपट, वेब सीरिज यामुळे प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे वळला. या ओटीटीवर चांगल्या कलाकृतीदेखील आहेत. त्याशिवाय, अॅडल्ट कटेंटदेखील आहे. यातील काही वेब सीरिज, चित्रपट हे कुटुंबासह पाहता येणार नाही इतके भडक आहेत. 


मस्तराम ते लस्ट स्टोरीजपर्यंत अशा अनेक वेब सीरिजना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या या वेब सीरिज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रेक्षकांसाठी आहेत. चुकूनही या वेब सीरिज लहान मुलांसोबत पाहू नका. 


लस्ट स्टोरीज


वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'चे दोन सीझन आहेत. या दोन्ही सीझनमध्ये हॉट सीन्सचा भडिमार आहे. पहिल्या सीझनमध्ये कियारा आडवाणीच्या बोल्ड सीन्सने प्रेक्षकांना धक्का दिला. तर, दुसऱ्या सीझनमध्ये तमन्ना भाटिया, विजय वर्मा यांच्या बोल्ड सीन्सची चर्चा झाली. 'लस्ट स्टोरीज' ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.


 



मस्तराम


बोल्ड, हॉट सीन्स असलेल्या वेब सीरिजमध्ये मस्तरामला वगळता येऊ शकत नाही. वयस्करांसाठी असलेले मासिक आणि लेखक याच्यावर ही वेब सीरिज आधारीत आहे. या वेब सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये बोल्ड सीन्सचा भडिमार आहे. 'मस्तराम'ही वेब सीरिज 'एमएक्स प्लेअर' , उल्लू या ओटीटी अॅपवर पाहता येईल.



व्हर्जिन भास्कर


ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजी हा ओटीटी प्लॅटफॉर्म 18 वर्षाहून अधिक वयाच्या प्रेक्षकांसाठी ओळखला जातो. या प्लॅटफॉर्मवर व्हर्जिन भास्कर ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्येही बोल्ड सीन्सचा भडिमार आहे. 



गंदी बात 


वेब सीरिजच्या नावावरुन ही वेब सीरिज कशी असेल याचा अंदाज येतो. 'गंदी बात'चे काही सीझन आले आहेत. या प्रत्येक सीझनमध्ये सगळ्याच एपिसोडमध्ये बोल्ड सीन्सचा भडिमार आहे. ही वेब सीरिजही ऑल्ट बालाजी या 



चरित्रहीन


'चरित्रहीन' ही एडल्ट वेब सीरिज आहे. या सीरिजमध्येही हॉट-बोल्ड सीन्सचा भडिमार आहे. ही वेब सीरिज Hoichoi या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतील.