India vs New Zealand Semi final : विश्वचषकातील सेमीफायनलच्या (World Cup 2023 Semi Final) सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत न्यूझिलंड सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.


भारत न्यूझिलंड सेमीफायनलला सेलिब्रिटी लावणार हजेरी


आजच्या भारत न्यूझिलंड सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही (David Beckham) समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती लावू शकतो.


दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसह गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) हे दोघेही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे. त्य़ाचप्रमाणे जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस् (Vivian Richards),  अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी (Nita Ambani) हे देखील सामना पाहण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे. 


भारत न्यूझिलंड सेमीफायनलसाठी मुंबई पोलीस सज्ज


दिवाळीची सुट्टी आणि त्यात इंडिया विरोधात न्युझीलँडचा क्रिकेट सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. याचा जल्लोष देशभरात पाहायला मिळणार आहे. मुंबईत या सामन्याचा चांगलाच जल्लोष पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी या सर्व परिसरात बॅरिकेटिंग केली असून वानखेडे स्टेडियमच्या आत जाणाऱ्या सर्व गेटच्या रोडवर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आज मुंबईच्या वानखडे स्टेडियम वर येत असल्याने मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसापासून याची तयारी करत आहेत. 


मुंबई पोलिसातर्फे आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहेत की, नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा कारण या परिसरात पार्किंगसाठी खूप कमी जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना चर्चगेट व मरीन लाईन्स या स्टेशनवरून स्टेडियमच्या गेट पर्यंत जाण्यासाठी फुटपाट मार्ग बॅरिकेट लावून व्यवस्था करण्यात आलेली आहे. 


मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज इंडिया विरोधात न्युझीलँड चा सामना होणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण टिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलीस गेल्या अनेक दिवसापासून हे वारंवार आव्हान करत आहे की, तिकीट काउंटर वरुनच तिकीट घ्यावे अथवा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गेल्या काही दिवसात मुंबई पोलिसांनी दोन विविध गुन्हा दाखल करून तिकीट चा होणाऱ्या काळाबाजारचा पर्दाफाश केला होता.


संबंधित बातम्या


मुंबईतील वर्ल्डकप सेमीफायनलच्या तिकीटांची चौपट दरांत विक्री, मुंबई पोलिसांनी सापळा रचला, एकजण ताब्यात