India's Most Successful Actor : भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या कलाकारांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. अनेक कलाकारांनी इतिहास रचला आहे. सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) या कलाकारांनी इतिहास रचला. पण दाक्षिणात्य सुपरस्टार प्रेम नजीर (Prem Nazir) हे भारतातील यशस्वी सुपरस्टार ठरले आहेत.


80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर केलं राज्य


मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रेम नजीर हे आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये प्रेम नजीर यांचा समावेश होतो. 50 ते 80 व्या दशकापर्यंत प्रेम नजीर यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. प्रेम यांनी त्यांच्या करिअरमध्ये 900 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. 720 सिनेमे केल्याबद्दल त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. प्रेम नजीर यांनी त्यांच्या सिनेप्रवासात 400 हिट सिनेमांत काम केलं आहे. यातील 50 सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. अद्याप एकाही सुपरस्टारला प्रेम नजीर यांचा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही. 


बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे मोडले रेकॉर्ड 


प्रेम नजीर यांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी सिनेमे देण्याचा रेकॉर्ड केला आहे. अद्याप एकाही बॉलिवूड सुपरस्टारने 100 हिट सिनेमे दिलेले नाहीत. अमिताभ बच्चन यांनी 56 आणि राजेश खन्ना यांनी 42 यशस्वी सिनेमे दिले आहेत. सलमान खानने 30 हिट सिनेमांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेदेखील 100 पेक्षा अधिक हिट सिनेमे दिलेले नाहीत. 


400 हिट आणि 50 ब्लॉकबस्टर सिनेमांचा रेकॉर्ड प्रेम यांच्या नावावर


मीडिया रिपोर्टनुसार, प्रेम नाजीर यांनी 400 हिट सिनेमांत काम केलं आहे. यातील 50 सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. सलमान खानने फक्त 15 ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तर रजनीकांत यांच्या नावावर 13 ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्याचा रेकॉर्ड आहे.


रंगभूमीवर पदार्पण अन् करिअरची सुरुवात


प्रेम नजीर यांनी 1926 मध्ये टीनएज थिएटरच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'मरुमकल' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रोमँटिक आणि ट्रेजडी सिनेमांसाठी ते ओळखले जातात. 


प्रेम नजीर यांनी सहाय्यक भूमिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आहे. 1989 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एक वर्षांनी Kadathanadan Ambadi हा सिनेमा रिलीज झाला. 


संबंधित बातम्या


Salman Khan : 'टायगर'नंतर बब्बर शेरच्या भूमिकेत दिसणार सलमान खान; कबीर खानने दिली सिनेमाची ऑफर