IND vs PAK World Cup 2023 : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भारतीय संघाचनं विश्वचषकाच्या रणांगणात (IND vs PAK) पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून सलग तिसरा विजय साजरा केला. विश्वचषकाच्या मोहिमेत भारताने सलग तिसरा विजय साजरा केला. अशातच आता या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारत-पाक सामन्यादरम्यान अरिजित सिंह (Arijit Singh) अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) फोटोशूट करताना दिसत आहे.


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक सामना रंगला. यावेळी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने हजेरी लावली होती. लोकप्रिय गायक अरिजित सिंहचादेखील प्री-मॅचमध्ये एक खास गाणं गायलं. अशाकत आता अरिजित सिंह आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित आणि अनुष्का एकमेकांसोबत हातवारे करताना दिसत आहेत. 






अरिजितने केलं अनुष्काचं फोटोशूट


अरिजित सिंहने अनुष्काचं खास फोटोशूट केलं आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, अरिजितने खिशातून फोन काढला असून तो अनुष्काचे फोटो काढत आहे. अनुष्कादेखील काहीही न बोलता त्याला आपले फोटो काढू देत आहे. अरिजित-अनुष्काच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


विश्वचषकाच्या मैदानात भारताचा पाकिस्तानवर सात विकेट्सनी विजय  


रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून सलग तिसरा विजय साजरा केला. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग आठवा विजय ठरला. या विजयासह भारतानं पाकिस्तानवरच्या निर्विवाद वर्चस्वाची आपली परंपरा कायम राखली. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आज पाकिस्तानची अवघ्या 191 धावांत दाणादाण उडवली. आणि तिथंच भारतानं निम्मी लढाई जिंकली. 


रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 77 धावांच्या भागिदारीनं भारताला विजयपथावर नेलं. रोहित शर्मानं 63 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 86 धावांची मॅचविनिंग खेळी उभारली. श्रेयस अय्यरनं 62 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 53 धावांची खेळी रचली. त्याआधी पाकिस्तानच्या डावात जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स भारतीय विजयात मोलाचं योगदान दिलं.


संबंधित बातम्या


हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानची हवा निघाली, भारताने 191 धावात गुंडाळलं