मुंबई: सोशल मीडियाच्या दबदबा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीही या माध्यमाचा फारच खुबीनं वापर करतात. त्यातही ट्विटरवर सेलिब्रिटी आजकाल जरा जास्तच अॅक्टिव्ह झाले आहेत. या सेलिब्रिटीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यामुळेच ट्विटरवरही त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच वाढ होत असून आतापर्यंत त्यांचे तब्बल 2.2 कोटी फॉलोवर्स झाले आहेत.


 

अमिताभ बच्चन यांच्यानंतर ट्विटरवर अभिनेता शाहरुख खान (2.08 कोटी फॉलोवर्स), सलमान खान (1.9 कोटी फॉलोवर्स), आमीर खान (1.83कोटी फॉलोवर्स) या बॉलिवूड अभिनेत्यांचा नंबर लागतो. तर अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांचे ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोवर्स आहेत. दीपिकाचे 1.56 कोटी आणि प्रियंकाचे 1.48 कोटी ट्विटर फॉलोवर्स आहेत.

 

अमिताभ बच्चन यांनी 2010 मध्ये ट्विटरवर अकाउंट सुरु केलं होते. त्यांचे दोन कोटीं फॉलोवर्स झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर एक फोटो अपलोड करुन आपला आनंद व्यक्त केला. तसेच आपल्या चाहत्यांचेही आभार मानले.

 


अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक आणि ब्लॉगवरही बरेच अॅक्टिव्ह असतात.