मुंबईः 'रुस्तम' सिनेमाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करताच अक्षय कुमारच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. या वर्षात बॉक्स ऑफिसवर चार सिनेमांनी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामध्ये अक्षय कुमारचेच तीन सिनेमे आहेत.   सलमान खानच्या 'सुलतान'ने या वर्षात सर्वाधिक कमाई केली आहे. त्यानंतर अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट', 'हाऊसफुल 3' आणि आता 'रुस्तम'ने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा 'रुस्तम' हा अक्षय कुमारचा सहावा सिनेमा ठरला आहे.   https://twitter.com/taran_adarsh/status/766946509942251521   या वर्षात 'एअरलिफ्ट'ने 127 कोटींची कमाई केली, तर 'हाऊसफुल 3'ने 107 कोटींपर्यंत मजल मारली आहे. त्यानंतर 'रुस्तम'ने एका आठवड्यातच 100 कोटींचा टप्पा पार केला. 'रावडी राठोड' हा अक्षय कुमारचा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 134 कोटींची कमाई करणारा सिनेमा आहे.   अक्षय कुमारचे 100 कोटींचा टप्पा गाठणारे सिनेमेः  
  • रावडी राठोड- 134 कोटी
  • एअरलिफ्ट- 127 कोटी
  • हाऊसफुल 2- 116 कोटी
  • हॉलिडे- 113 कोटी
  • हाऊसफुल 3- 107 कोटी
  • रुस्तम- 101* कोटी