IIT Baba after India win against Pakistan: भारताने पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या सामन्याची चांगलीच चर्चा झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानला पाणी पाजले. गेल्या अनेक दिवसांपासून देशातले कोट्यवधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात होते. असे असताना आता 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, भारताने कितीही प्रयत्न केला तरी, यावेळी पाकिस्तानचाच विजय होणार आहे, अशी भविष्यवाणी आयआयटी बाबाने केली होती. आता हीच भविष्यवाणी म्हणजे फुसका बार निघाला आहे. आता चुकीची भविष्यवाणी केल्यानंतर याच आयआयटी बाबाने प्रतिक्रिया दिली आहे.
आयआयटी बाबाने काय भविष्यवाणी केली होती?
आयआयटी बाबाने एका यूट्यूबरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आयआयटी बाबाने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर भविष्यवाणी केली होती. या सामन्यात पाकिस्तानचाच विजय होणार आहे, असं भविष्य या बाबाने सांगितलं होतं. सोबतच भारताने कितीही जोर लावाल तरी, विराट कोहलीने कितीही जोर लावला तरी भारत यावेळी जिंकू शकणार नाही, असंही हा आयआयटीयन बाबा म्हणाला होता. आता मात्र त्याचं हे भविष्य पूर्णपणे फसलं आहे. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.
यातून एकच संदेश घ्यायचा, तो म्हणजे...
भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलंय. संपूर्ण सामन्यात एकदाही पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू शकला नाही. उलट भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता आयआयटीयन बाबा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आयआयटीयन बाबाने ज्या यूट्यूबरसोबत बोलताना ही भविष्यवाणी केली होती, त्याच यूट्यूबरने आयआयटीयन बाबाशी फोनवरून संपर्क साधला आणि तुमची भविष्यवाणी चुकीची ठरली, तुमचं काय मत आहे? असं विचारलं. विशेष म्हणजे या प्रश्नावर आयआयटीयन बाबाने अत्यंत चलाखीने उत्तर दिलंय. "यातून एकच संदेश घ्यायचा. तो म्हणजे कोणाच्याही भविष्यवाणीवर विश्वास ठेवायचा नाही. स्वत:चं डोकं लावायचं," असं आयआयटीयन बाबाने म्हटलंय.
रोहितचं शतक, कुलदीप यादवने घेतले तीन बळी
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारतापुढे 242 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराट कोहलीने या सामन्यात शतक ठोकले. त्याने नाबाद 100 धावा केल्या. त्याचे हे 82 वे अंतरराष्ट्रीय आणि 51 एकदीवसीय शतक आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या कुलदीप यादवने तीन बळी घेतले. तर हार्दिक पांड्यानेही दोन गडी बाद केले. पाकिस्तानच्या सऊद शकील (62) याने सर्वाधिक धावा केल्या.
हेही वाचा :