IIFA Awards 2022 : यंदाच्या ‘आयफा अवॉर्ड्स 2022’मध्ये (IIFA 2022) शाहिद कपूर (Shahid Kapoor) परफॉर्म करणार असून, यासाठी तो अबुधाबीला पोहोचला आहे. याच ठिकाणी IIFA 2022चा कार्यक्रम होणार आहे. शाहीद ‘आयफा 2022’मध्ये दिवंगत गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांना श्रद्धांजली वाहणार आहे. याबाबतचा खुलासा खुद्द शाहिदने पत्रकार परिषदेत केला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेदरम्यान शाहिद कपूरला विचारण्यात आले की, तो यावेळी या सोहळ्यात काय खास काय करणार आहे?
यावर उत्तर देताना तो म्हणाला की, हे वर्ष खूप खास असणार आहे. कारण यावेळी तो त्याच्या गाण्यांवर परफॉर्म करणार नाही. मात्र, तो दिवंगत गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांवर सादरीकरण करणार आहे. यासाठी तो अबुधाबीच्या यास आयलंडला पोहोचला आहे.
बप्पी लाहिरी यांना वाहणार श्रद्धांजली
शाहिद कपूर म्हणाला, 'मी माझ्या अभिनयाने बप्पी दा यांना आदरांजली वाहीन. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांवर मी परफॉर्म करणार आहे. यावेळी मी माझ्या कोणत्याही गाण्यावर परफॉर्म करणार नाही, फक्त बप्पी दाच्या गाण्यांवर परफॉर्म करून त्यांना म्युझिकल ट्रिब्युट देणार आहे.’
स्टेजवर परतण्यासाठी शहीद खूश
आयफा न्यूयॉर्कमध्ये शेवटचा परफॉर्म केलेला शाहिद आता स्टेजवर परतण्यासाठी उत्सुक आहे. याविषयी सांगताना तो म्हणाला, 'मला लाईव्ह परफॉर्म करायला आवडते. यामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात उत्तम कनेक्शन निर्माण होते. यावेळी मी माझी गाणी सादर करणार नाही. मला माझ्या गाण्यांमध्ये परफॉर्म करण्याची परवानगी नाही, पण मी बप्पी दा यांना विशेष आदरांजली वाहणार आहे. यासाठी मी खूप उत्सुक आहे.
‘आयफा’चे हे सेलिब्रेशन आज (3 जून) होणार आहे, ज्याचे सूत्रसंचालन फराह खान, सलमान खान आणि अपारशक्ती खुराना करणार आहेत. याशिवाय देवश्री प्रसाद, तनिष्क बागची, गुरु रंधावा, हनी सिंग, नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली, असीस कौर हे कलाकार परफॉर्म करणार आहेत. तर, 4 जून रोजी होणाऱ्या ग्रँड सोहळा सलमान खान, रितेश देशमुख, मनीष पॉल होस्ट करतील आणि या दिवशी टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही परफॉर्म करणार आहेत.
हेही वाचा :