मुंबई : आयफा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी अवघी इंडस्ट्री उपस्थित होती. आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या 'राझी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. तर याच सिनेमातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पद्मावत सिनेमासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आयुष्मान खुरानाच्या अंधाधुन सिनेमाला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.


आयफा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी आयफा पुरस्कार परदेशाता होतात. मात्र यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात सलमान खान, कटरिना कैफ, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा, शाहिद कपूर, विकी कौशल, अदिती राव हैदरी, डेजी शाह, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेते

सर्वोत्कृष्ट सिनेमा - राझी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - श्रीराम राघवन (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (राझी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंह (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट कथा - अंधाधुन



सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अदिती राव हैदरी (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विक्की कौशल (संजू)



सर्वोत्कृष्ट संगीतकार - गुरु रंधावा, रोचक कोहली, सौरभ-वैभव, हनी सिंह आणि जॅक नाइट (सोनू के टीटू की स्वीटी)
सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य (धडक)
सर्वोत्कृष्ट गायिका - हर्षदीप कौर आणि विभा सराफ (दिलबरो, राझी)
सर्वोत्कृष्ट गायक - अरिजीत सिंग (ऐ वतन, राझी)



सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण) - ईशान खट्टर (धड़क)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) - सारा अली खान (केदारनाथ)



IIFA BIG 20 Award (स्पेशल अवॉर्ड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार हिरानी (थ्री इडियट्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (चेन्नई एक्सप्रेस)
सर्वोत्कृष्ट संगीतकार - प्रीतम (ऐ दिल है मुश्किल)
The Master of Comedy- जगदीप जाफरी
The Master of Dance and Choreography- सरोज खान- प्रीतम (ऐ दिल है मुश्किल)