गोवा : 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 मधे इंडियन पॅनोरमा विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 22 कथाधारित चित्रपटांची निवड करण्यात आली असून शाजी एन करुण दिग्दर्शित ‘ओलू’ या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरमाची सुरुवात होणार आहे.
या 22 चित्रपटात मराठी चित्रपटांमध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘आम्ही दोघी’ या चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे. कथाबाह्य इंडियन पॅनोरमा चित्रपट विभागासाठी 21 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची व 8 मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आली आहे. चित्रपट दिग्दर्शक राहुल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली 13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.
‘लघुपट’ चित्रपटांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ या मराठी लघुपट प्रदर्शनाने प्रारंभ होणार आहे. मेधप्रणव पोवार यांचा ‘हॅपी बर्थ डे’, नितेश पाटणकरांचा ‘ना बोले वो हराम’, प्रसन्ना पोंडेंचा ‘सायलेंट स्क्रीम’, सुहास जहागिरदार यांचा ‘येस आय ॲम माऊली’, शेखर रणखांब यांचा ‘पाम्पलेट’, गौतम वझे यांचा ‘आई शपथ’, आणि स्वप्नील कपुरे यांचा ‘भर दुपारी’ या 8 लघुपटांचा समावेश आहे.
IFFI मध्ये 'धप्पा', 'आम्ही दोघी' चित्रपटांची इंडियन पॅनोरमासाठी निवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2018 12:54 PM (IST)
13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -