Mukesh Khanna : छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका 'शक्तिमान' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेमुळे मुकेश खन्ना (Mukesh Khanna) घराघरांत पोहोचला. पण महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता मुकेश खन्ना चर्चेत आला आहे. दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडे मुकेश खन्ना विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण "मी एफआयआरला घाबरत नाही", असे वक्तव्य मुकेश खन्नाने केलं आहे.


दिल्ली पोलिसांना मुकेश खन्ना विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला आयोगाने केली आहे. मुकेश खन्ना विरोधात सर्वत्र टीका होत आहे. अशातच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाला,"मी एफआयआरला घाबरत नाही. मला माझ्या बोलण्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही". 






अभिनेता मुकेश खन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मुकेश म्हणत आहे,"जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारते ती तिचा व्यवसाय करत. कारण कोणत्याही सुसंकृत समाजातील मुलगी असं बोलत नाही. त्यांनी हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी मुकेश खन्नाला ट्रोल करत आहेत. 


मुकेश खन्ना गेल्या अनेक दिवसांपासून टीव्ही शो आणि सिनेमांपासून दूर आहे. तो फक्त यूट्यूबवरच दिसतो. त्याने शक्तीमान, वारिश, विश्वामित्र, महायोधा, चंद्रकांता यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहेत.


संबंधित बातम्या


Shaktimaan Movie : 'शक्तिमान' चे 300 कोटींचे बजेट; मुकेश खन्ना म्हणाले, 'माझ्याशिवाय हा चित्रपट होऊच शकत नाही'


Shaktimaan Movie : 'हा' अभिनेता साकारणार 'शक्तिमान'ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग