ABP Network Ideas of India Summit 2023:  ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) आणि झीनत अमान (Zeenat Aman) यांनी एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) आयडियाज ऑफ इंडिया (ABP Network Ideas of India Summit 2023) या परिसंवाद कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी या दोघींनी मनोरंजनक्षेत्रातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. 


'चित्रपटामधील हिरोंना तुमची भिती वाटत होती का?' असा प्रश्न आशा पारेख आणि झीनत अमान  यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर आशा पारेख यांनी उत्तर दिलं, 'कदाचित, माझा चेहरा तसा होता, ज्यामुळे लोकांना माझी भिती वाटत आसेल.'


झीनत अमान यांनी सांगितलं, 'मला असं कधी वाटत नव्हतं की मला कोणी घाबरत असेल. आम्ही खूप आनंदात काम करत होतो. जेव्हा इंसाफ का तराजू या चित्रपटात मी काम करत होते तेव्हा राज बब्बर  आणि दीपक पाराशर हे अभिनेते नवीन होते. त्यामुळे कदाचित त्यांना भिती वाटत असेल.'


आशा पारेख यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही आठवणी देखील सांगितल्या. त्या म्हणाल्या, 'माझ्या पहिल्या चित्रपटात मी अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत काम केलं. एकत्र काम केल्यानंतर आम्ही बोलायला लागलो. त्यानंतर मी धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं. आम्ही सीनचं शूटिंग केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बसत होतो. ज्यावेळी मी दार्जिलिंगमध्ये शूटिंग करत होतो. त्यावेळी ओमप्रकाशजी मला म्हणाले की, मला टेंशन येत होते की, तुम्ही रोमँटिक सीन कसे शूट करणार? मी अनेक वेळा हिरोपासून लांबच राहात होते.'


चित्रपटांमधील गाण्यांबाबत देखील झीनत अमान यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, 'चित्रपसृष्टीतील प्रवासामध्ये मला अनेक हिट गाणी मिळाली, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मी या गाण्यांना आवडीनं ऐकते.' झीनत अमान आणि आशा पारेख यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'


एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.



संबंधित बातम्या


Ideas of India Summit 2023 : वडील सुपरस्टार असूनही निवडलं संगीतक्षेत्र, लकी अली म्हणतात, 'अभिनय अवघड नाही, पण संगीत खास'