कोलकाता : प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी कोलकात्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृणाल सेन यांचं बंगाली चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे.
मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन सेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृणाल सेन यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या फरीदपूरमध्ये 14 मे 1923 रोजी झाला होता.
भूबन शोमे, मृगया, खंदाहार यासारख्या हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी बैशे श्रबण, ओका ऊरी कथा, अकलेर सांधने, खारीज अशा बंगाली चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
सत्यजीत रे, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन या बंगाली भाषिक दिग्दर्शकत्रयीने 50 च्या दशकात वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची लाट आणली होती. सेन यांच्या चित्रपटात वेगळी सौंदर्यदृष्टी होती. मृणाल सेन यांनी आपल्या सिनेमातून सामाजिक-राजकीय विषय प्रभावीपणे मांडले होते.
प्रतिभावंत दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2018 04:41 PM (IST)
मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -