मुंबई : 'हम आपके हैं कौन' या अजरामर सिनेमाचा रिमेक बनला तर त्यात प्रेम आणि निशाच्या भूमिकेत आलिया भट आणि वरुण धवन यांना पाहायला आवडेल, असं अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाली. 23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हम आपके हैं कौन'मध्ये प्रेमची भूमिका सलमान खानने तर निशाची भूमिका माधुरी दीक्षितने साकारली होती. तर रेणुका शहाणे माधुरीच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत होती.
रेणुका म्हणाली की, "तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून 'हम आपके हैं कौन' पुन्हा बनवला तर मला त्यातल्या व्यक्तिरेखा मॉडर्न अंदाजात पाहायला आवडतील. 'हम आपके हैं कौन' हा कौटुंबिक चित्रपट आहे. यात प्रत्येकाचं एकमेकांवर प्रेम आहे. सिनेमात लग्नाचं संगीत, मेहंदी यांसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. त्याची फॅशन आजही कायम आहे. त्यामुळे 'हम आपके है कौन'चा रिमेकही सगळ्यांना आवडेल. निशा आणि प्रेमच्या भूमिकेत मला आलिया भट आणि वरुण धवनला पाहायला आवडेल."
"सध्याचा काळ मोबाईल फोन, फेसबुक आणि ट्विटरचा आहे. त्यामुळे दिग्दर्शक टफीचे सीन कसे दाखवतील, हे मला माहित नाही. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये टफी मोहनीश बहलला पत्र आणून देतो, तेव्हा प्रेमच्या निशाबद्दच्या भावना काय आहेत, हे मोहनीशला समजतं. पण चित्रपटाचा रिमेक बनवणं फारच मजेशीर असेल," असंही रेणुका शहाणे म्हणाली.
तुला सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल का, असं विचारला असता रेणुकाने उत्तर दिलं की, "हो नक्कीच. राजश्री प्रॉडक्शनसोबत काम करण्यासाठी मी कायमच तयार आहे. हे माझ्यासाठी माहेरासारखं आहे. सूरज बडजात्या फारच चांगला माणूस आहे. पण चित्रपटात माझं पात्र आधीचं मेलं आहे. त्यामुळे रिमेकमध्ये माझ्यासाठी करण्यासारखं फार काही असेल, असं मला वाटत नाही."
'हम आपके हैं कौन'च्या रिमेकमध्ये आलिया-वरुण असावेत : रेणुका शहाणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jan 2018 01:43 PM (IST)
"तरुण पीढीला डोळ्यासमोर ठेवून 'हम आपके है कौन' पुन्हा बनवला तर मला त्यातल्या व्यक्तिरेखा मॉडर्न अंदाजात पाहायला आवडतील. 'हम आपके है कौन' हा कौटुंबिक चित्रपट आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -