माद्रिद (स्पेन): बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं नुकतंच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं बराच अडचणीत आला आहे. बलात्काराच्या त्या वक्तव्यावर त्याच्यावर चौफर टीकाही होत. याबाबत बोलताना सलमान म्हणाला की, "आता मला कमी बोलायला हवं, कारण की, सध्या मी जे काही बोलतो त्याचा उलट अर्थ काढला जातो."

 
सलमाननं ही प्रतिक्रिया आयफा अवॉर्ड दरम्यान दिली. अवॉर्ड सोहळ्याचा सुरुवातीला बोलताना सलमान म्हणाला की, 'मी जास्त वेळ नाही बोलणार. कारण की, या दिवसात मी जेवढं कमी बोलेन तेच माझ्यासाठी चांगलं असेल.'

 

बलात्काराच्या वक्तव्यावर सलमाननं जाहीर माफी मागावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. मात्र, अजूनही सलमाननं याबाबत माफी मागितलेली नाही.

 

‘सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान

 

‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं होत.

 

‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’   असं वादग्रस्तव वक्तव्य त्यानं केलं होतं.

 

बलात्कार पीडितसंदर्भातील विधानावर वाद झाल्याने त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफी मागितली होती. 'सलमानने त्याच्या कामाबाबत जे उदाहरण दिलं, ते चुकीचंच आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. पण त्याचा उद्देश चुकीचा नव्हता', असं सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

 

सलमानच्या 'बलात्कार पीडित' विधानावर सलीम खान यांचा माफीनामा