मुंबई: बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. अनेक गोष्टीशी तडजोड करावी लागते. विशेष करुन अभिनेत्रींना अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणावतने आपल्या संघर्षमय जीवनातले काही किस्से उघड केले आहेत, जे जाणून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
नेहा धूपियाच्या '#नोफिल्टरनेहा' या शोमध्ये कंगनाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातले संघर्षमय जीवनातले अनुभव सांगितले आहेत. तिला 'रंगून' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला कपडे बदलण्यासाठी एखाद्या मोठ्या दगडांचा अडोसा घ्यावा लागत होता. तसेच लघुशंकेसाठीही मोठमोठ्या दगडांचा आधार घ्यावा लागत असे.
कंगना म्हणाली की, ''विशाल भारद्वाज यांचा पीरियड ड्रामा 'रंगून' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला अरुणाचल प्रदेशच्या अतिशय दुर्गम भागात जावे लागले. या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. इथे एखादे गावही नव्हते, किंवा शैचालय. त्यामुळे मला आणि शाहिद यांच्यासोबत इतर क्रू मेंबर्सनाही लघुशंकेसाठी दगडांचा आडोसा घ्यावा लागत असे.''
कंगना पुढे म्हणाली की, ''सुरुवातीला हे सर्व प्रकार भितीदायक होते, मात्र, जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर येता, तेव्हा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यावेळी तुम्ही सेलिब्रेटी आहात की, सर्व सामान्य व्यक्ती यावरुन कोणताही फरक पडत नाही. तुम्हाला तिथं एक्सपोझ व्हावं लागतं.''
यावेळी तिने आणखी एक अनुभवही सांगितला. तिला 'क्वीन' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी चक्क कॅफेमध्ये कपडे बदलावे लागले होते.