साखरपुड्याच्या चर्चांवर अभिनेत्री इशा गुप्ताचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2016 05:06 AM (IST)
मुंबई : सोशल मीडियावर साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने स्पष्टीकरण दिलं आहे. माझा साखरपुडा झाला नाही, असं स्पष्टीकरण 'जन्नत 2', 'राज 3' सारख्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री इशा गुप्ताने ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे. इशा गुप्ताने 9 एप्रिल रोजी हिऱ्याची अंगठी बोटात असलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. "त्याने मला विचारलं आणि मी होकार दिला," असं कॅप्शन 30 वर्षांच्या बॉलिवूड ब्यूटीने दिलं होतं. त्यामुळे तिचा सारखपुडा झाल्याची चर्चा होती.