नवी दिल्ली : 'जन्नत 2', 'राज 3' सारख्या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री एशा गुप्ताचा साखरपुडा झाला आहे. मात्र आपल्या भावी नवऱ्याचं नाव तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. हिऱ्याची अंगठी बोटात असलेला फोटो एशाने इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन शेअर केला. त्याने मला विचारलं आणि मी होकार दिला, असं कॅप्शन 30 वर्षांच्या बॉलिवूड ब्यूटीने दिलं आहे. एशा आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांमध्ये झळकली आहे. रुस्तम आणि हेराफेरी 3 हे तिचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वर्षांत प्रिटी झिंटा आणि उर्मिला मातोंडकरसारख्या चाळीशीतील अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या. बिपाशा बसूनेही लग्नाची घोषणा केली आहे. त्याचवेळी एशाचा साखरपुडाही बॉलिवूडसाठी आनंदाची गोष्ट आहे.