Hrithik Roshan On Vijay Sethupathi: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. हृतिकनं या चित्रपटात वेधा या खतरनाक गुंडाची भूमिका साकारली आहे. विक्रम वेधाच्या साऊथ व्हर्जनमध्ये वेधा ही भूमिका अभिनेता विजय सेतूपतीनं साकारली. आता विजय सेतूपतीसोबत काही लोक हृतिकची तुलना करत आहेत. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हृतिकनं सांगितलं.
काय म्हणाला हृतिक?
'माझी तुलना इतर अभिनेत्यांसोबत केली जाऊ शकते, ही गोष्ट मी डोक्यात ठेवून काम करत नाही. असंच अग्निपथ या चित्रपटाच्या वेळी पण झालं होतं. पण मी एकादी भूमिका आवडली तर इतर कोणताही विचार न करता काम करतो.' असं हृतिकनं मुलाखतीमध्ये सांगितलं.
'विक्रम वेधा' या अॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. 'विक्रम वेधा'ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर पोलीस असलेला विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे. चोर-पोलिसांच्या या पाठशिवणीच्या खेळ या चित्रफटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी विक्रम वेधा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ट्रेलरमधील परफॉर्मन्ससाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Vikram Vedha : करीनाने पाहिला सैफचा चित्रपट ‘विक्रम वेधा’, म्हणाली ‘पिक्चर ब्लॉकबस्टर’!