Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. आता ते दोघे विमानतळावर स्पॉट झाले आहेत. नवं वर्षाचं स्वागत हृतिक परदेशात करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी हृतिक सुझान खानपासून विभक्त झाला होता. सुझानपासून विभक्त झाल्यापासून तो सबा आझादला डेट करत आहे. आता तो सबा आणि दोन्ही मुलांना घेऊन परदेशात रवाना झाला आहे. हृतिक परदेशात रवाना झाल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


हृतिक सिनेमांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो सबाला डेट करत आहे. अद्याप दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता हृतिकचा विमानतळावरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 






व्हायरल होणारा व्हिडीओ विमानतळावरचा आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक गाडीतून उतरताना दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत त्याची दोन मुलं आणि सबादेखील दिसत आहेत. मुलांना नाताळच्या सुट्ट्या लागल्याने हृतिक परदेशात रवाना झाला आहे. नववर्षाचं स्वागत तो परदेशातून करणार आहे. 


अभिनेता हृतिक रोशन 2000 साली सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यामुळे 2014 साली हृतिक आणि सुझान विभक्त झाले. सुझान सध्या अरसलान गोनीला डेट करत असल्याची चर्चा आहे. हृतिक आणि सबा एकमेकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरही कमेंट्स करत असतात. तसेच एकमेकांसोबतचे फोटो ह्रतिक आणि सबा सोशल मीडियावर शेअर करतात. 


संबंधित बातम्या


Hrithik Roshan Watch Kantara: 'खूप काही शिकलो...' कांतारा पाहिल्यानंतर हृतिकनं शेअर केली खास पोस्ट