मुंबई : देशामधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करुन खळबळ माजवणाऱ्या अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. "तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे आहे", असा प्रश्न खेर यांनी नसीरुद्दीन शहांना विचारला आहे.


भारतातील सद्यस्थितीबद्दल अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली होती. "समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायची मला भीती वाटते" असे विधान नसीरुद्दीन शहा यांनी केले होते.

अनुपम खेर म्हणाले की, "तुम्ही या देशात भारतीय सेनेला शिव्या देऊ शकता, सेनेच्या जवानांवर दगडफेक करु शकता, तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे आहे."

शहा म्हणाले होते की, "आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते," त्यानंतर अनेकांनी शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


वाचा : मुलांना भारतात ठेवायची भीती वाटते : नसीरुद्दीन शहा