मुंबई : अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही भन्नाट कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 15.21 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
  तीन जून 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटाची स्पर्धा नव्हती. गेल्या आठवड्यातील फोबिया, वीरप्पन बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी बजावू शकले नाहीत. त्यातच अक्षय-रितेश-अभिषेक या तगड्या कलाकारांसोबत जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाक्री, लिसा हेडन या अभिनेत्रीही चित्रपटात झळकल्या आहेत.    

ओपनिंग डेच्या कमाईत 'फॅन' वरचढ

  शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटाने ओपनिंग डे म्हणजेच रिलीजच्या दिवशी केलेल्या माईत वर्चस्व राखलं आहे. 2016 मध्ये पहिल्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हे बिरुद 'फॅन'ने कायम राखलं आहे. हाऊसफुल सिरीजमधल्या या चित्रपटाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.    

चित्रपट

पहिल्या दिवसाची कमाई

फॅन 19.20 कोटी
हाऊसफुल 3 15.21 कोटी
एअरलिफ्ट 12.35 कोटी
बागी 11.94 कोटी
    हाऊसफुल 3 भारतात 3700, तर परदेशात 670 स्क्रीन्सवर झळकला आहे. बॉलिवूड ट्रेण्ड अॅनलिस्ट तरण आदर्श यांच्या अंदाजानुसार पहिल्या विकेंडला हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा पार करु शकतो.     https://twitter.com/taran_adarsh/status/738995162840322048  

संबंधित बातम्या :

सिद्धार्थ जाधववर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टीकरण

दुकानात कपडे चोरताना रितेश देशमुख CCTV मध्ये कैद

लिझाला डिवचल्याने अक्षयची सटकली, सिद्धार्थ जाधववर वैतागला