Prithviraj : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा सिनेमा चर्चेत आला आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हा सिनेमा पाहणार आहेत. 

रिपोर्टनुसार, सिनेमा रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 1 जूनला या सिनेमाचे दिल्लीत स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगला अमित शाह यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री तसेच राजकारणातले दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित 'पृथ्वीराज' हा सिनेमा आहे. अमित शाह यांना पृथ्वीराज चौहान यांच्यासंबंधित गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. त्यामुळे ते हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच पाहणार आहेत, असे म्हटले जात आहे. 

रिलीजपूर्वीच 'पृथ्वीराज' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला

'पृथ्वीराज' सिनेमाचं नाव बदलण्यात यावं, अशी करणी सेनेने यशराज फिल्समच्या सीईओंकडे मागणी केली आहे. करणी सेनेचे प्रवक्ते सुरजीत सिंह राठोड म्हणाले, यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांची आम्ही भेट घेतली आहे. लवकरच सिनेमाचे नाव बदलण्यात येईल, असे त्यांनी आम्हाला वचन दिले आहे. आमची मागणी पूर्ण करण्यास यशराज यशराज फिल्म्स तयार आहे. पण अद्याप यासंदर्भात यशराज फिल्म्सकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

'पृथ्वीराज' या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. यश राज फिल्म्सनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाचे कथानक हे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  मानुषी छिल्लर या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

अक्षय कुमारनं या सिनेमात 'पृथ्वीराज' ही प्रमुख भूमिका साकारली असून मानुषी छिल्लरने संयोगिता ही भूमिका साकारली आहे. संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा या कलाकारांनी सिनेमात महत्तवाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Prithviraj Controversy : ‘पृथ्वीराज’ सिनेमा पुन्हा चर्चेत; सिनेमाचं नाव बदला, करणी सेनेची मागणी

Prithviraj : देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं : अक्षय कुमार