मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिऑनच्या आयुष्यावर आधारित दिग्दर्शक दिलीप मेहता यांनी एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. यामध्ये सनी लिऑनसह पती डॅनियल वेबर यांनीही काम केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचा प्रीमियर शो टोरंटोमध्ये पार पडला. या प्रीमियर शोला डॅनियल वेबर उपस्थित होता. मात्र, सनी लिऑन उपस्थित नव्हती. सनीच्या अनुपस्थितीचं कारण आता समोर आलं आहे. सनी लिऑनवर आधारित डॉक्युमेंट्रीमध्ये काही न्यूड सीन आहेत. हे सीन डॉक्युमेंट्रीमधून हटवण्याची विनंती सनी लिऑनने दिग्दर्शक दिलीप मेहता यांच्याकडे केली होती. मात्र, दिलीप मेहतांनी ते सीन हटवण्यास नकार दिला. “फायनल कट दिग्दर्शकचा असतो. त्यानंतरच सिनेमा खऱ्या रुपाने समोर येतो. म्हणून सनी लिऑनची सूचना योग्य वाटली नाही. सनीची सूचना ऐकली असती, तर डॉक्युमेंट्रीमधलं माझं व्हिजनच यशस्वी झालं नसतं.”, असे स्पष्टीकरण दिग्दर्शक दिलीप मेहता यांनी दिलं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये काही न्यूड सीन आहेत, ज्यांच्यावर सनी लिऑनला आक्षेप होते. ते सीन कट करण्याची विनंती सनीने दिग्दर्शकाकडे केली होती. तिच्या सूचनेला सहमती न दर्शवल्याने घरगुती कार्यक्रमाचे कारण देत टोरंटोमध्ये प्रीमियर शोला सनी लिऑन अनुपस्थित राहिली.