मुंबई : सध्या डब किंवा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना चांगली लोकप्रियता मिळत आहे. इतकंच नाहीत हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई देखील करत आहेत. याचं उदाहरण म्हणजे मराठीतला नागराज मंजुळेचा 'सैराट' आणि एस एस राजमौलीचा 'बाहुबली : द बिगीनिंग'.


 

 

बाहुबली हा बिग बजेट सिनेमा होता. शिवाय तो हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. एकाच वेळी एवढ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा होता. सिनेमाने 600 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षक आता बाहुबली 2 ची वाट पाहत आहेत.

 

'बाहुबली 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!


 

पण बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या या चित्रपटात बॉलिवूड स्टार्स का नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला. हाच प्रश्न दिग्दर्शक एस एस राजमौली यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "एखादा बॉलिवूड स्टार दुसऱ्या कोणाशीही कमिटमेंट न करता, त्याच्या दोन वर्षाच्या तारखा देण्यास तयार होईल का?, हे कधीही शक्य होणार नाही."

 

'बाहुबली 2' टीझरच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला!


 

राजमौली म्हणाले की, "बाहुबलीची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे कथा आणि शेड्यूल तयार होती. त्यामुळे मला या सिनेमासाठी कलकारांच्या दोन वर्षांच्या तारखा घ्याव्या लागतील हे माहित होतं. तुम्हाला वाटत का, कोणताही बॉलिवूड स्टार त्याच्या दोन वर्षांच्या तारखा देण्यास तयार होईल? हे शक्यच नाही."

 

 

'बाहुबली: द कन्क्लूजन' 14 एपिल 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

'बाहुबली 2'च्या क्लायमॅक्स सीनचा खर्च तब्बल...