मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केलं. परंतु यावर आता आदित्य आणि दिशानेही भाष्य केलं आहे.


डिनर 'मातोश्री'वरच
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज (13 जून) वाढदिवस आहे. आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत, वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट आलं का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर 'मातोश्री'वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले की, डिनर मातोश्रीवरच करणार असल्याचं सांगितलं.

दिशाचं सडेतोड उत्तर
"मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न दिशाने ट्रोलर्सना विचारला आहे. पुरुष किंवा स्त्री यावरुन मी मित्रांची निवड करत नाही. मी ज्याच्यासोबत फिरते ते माझे मित्रच आहे. मी केवळ मुलींसोबतच मैत्री करत नाही. प्रत्येकाचेच मुली आणि मुलं असे मित्र असतात, असं दिशा पटानी म्हणाली.

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी डिनर डेटसाठी पुन्हा एकत्र, चर्चांना उधाण

डिनर डेटला दिशा पटानीला आदित्य ठाकरेंसोबत पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. टायगर कहां है? टायगर अभी जिंदा है, एक था टायगर, अशा कमेंट नेटिझन्सनी केल्या. यावर दिशा म्हणाली की, "लोकांनी काहीही म्हटलं तरी मी माझ्या मनाचंच ऐकते. लोकांच्या बोलण्याचा मला काहीही फरक पडत नाही."