मुंबई : बॉलिवूडमधील बऱ्याचशा कलाकारांना महागड्या कार वापरण्याचा शौक असतो. महानायक अमिताभ बच्चन यांची गाड्यांविषयीची हौस जगजाहीर आहे. बिग बींनी कोणे एके काळी वापरलेली मर्सिडीज बेंझ एस क्लास लक्झरी कार विक्रीस निघाली आहे. ओएलएक्स या शॉपिंग साईटवर या गाडीची जाहिरात पाहायला मिळत आहे.


बिग बींनी रेंज रोवर, लेक्सस एलएक्स 570, बेंटली काँटिनेंटल जीटी यासारख्या लक्झुरिअल कार्स वापरल्या आहेत. त्यांच्या ताफ्यात कोणे एके काळी असलेली मर्सिडीज विकत घेण्याची संधी तुम्हाला आहे. ओएलएक्सवर या गाडीची किंमत केवळ 9.99 लाख रुपये लावण्यात आली आहे. संबंधित मालक हा या गाडीचा तिसरा वापरकर्ता असल्याची माहिती आहे.

अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील 2100 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं



ती अमिताभ बच्चन यांनी वापरलेली कार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गाडीचा रंग आणि नोंदणी क्रमांक तोच असल्यामुळे शंकेला वाव कमी आहे. तरीही या पोस्टमधील तथ्य आणि सत्यता पडताळता आलेली नाही. या गाडीने आतापर्यंत 55 हजार किलोमीटर रनिंग केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आपल्या लाडक्या सुपरस्टारची गाडी विकत घेणं ही पर्वणी असू शकते. त्यामुळे या जाहिरातीनंतर किती जणांच्या उड्या पडल्या आणि त्यापैकी कोण या गाडीचा मालक होणार, याबाबत कुतूहल आहे.