मुंबई : कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे तर कधी सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचादेखील आज वाढदिवस आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि दिशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एकत्र डिनर केला होता. आज या दोघांचा एकत्र वाढदिवस असल्याने दोघेही एकत्र वाढदिवस साजरा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र दिसले होते. दोघांनीही या हॉटेलमध्ये डिनर केल्याचे बोलले जात आहे. याआधीसुद्धा दिशासोबत आदित्य ठाकरे एकदा डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती.

आदित्य आणि दिशा आता पुन्हा एकदा एकत्र दिसून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यात विशेष भर म्हणजे दोघांचे वाढदिवसही एकाच दिवशी असल्याने आज ते दोघे पुन्हा भेटणार का? एकत्र वाढदिवस सेलिब्रेट करणार का? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे. आज तिचा 27 वा वाढदिवस आहे. तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. आज आदित्य यांचा 29 वा वाढदिवस आहे.

लोकसभेत आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याचे संजय राऊत यांचे संकेत | ABP Majha 



जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर हे दोघे दिसून आले होते. त्यावेळी त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरुन अनेकांनी दिशाला ट्रोल केले.

दिशा नेहमी तिचा कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफसोबत दिसते. परंतु तिला आदित्य ठाकरेंसोबत पाहणे अनेकांच्या पचनी पडले नाही. दोघांना एकत्र पाहून नेटिझन्स 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या कमेंट करुन दिशाला ट्रोल करु लागले.
या डिनरसाठी दिशाने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तर आदित्य ठाकरेने पिवळ्या रंगाचं टीशर्ट आणि जीन्स घातली होती.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत होर्डींगबाजी, 'महाराष्ट्र वाट पाहतोय'चा संदेश | ABP Majha 



'या' मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार