Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरी 3' (Hera Pheri-3) च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात होतं. तो राजू ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा होती. पण आता राजू ही भूमिका अक्षय कुमारच (Akshay Kumar) साकारणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. 


'हेरा फेरी 3'चे दिग्दर्शन अनीज बज्मी नाही तर फरहाद सामजी साकारणार आहेत. आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार,  'हेरा फेरी 3' या  चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नसल्याचे कारण सांगून चित्रपटाला नकार दिला आहे, असं म्हटलं जात होते.  पण रिपोर्टनुसार, आता 'हेरा फेरी 3'  मध्ये राजू ही भूमिका अक्षय कुमारचं साकारणार आहे.


रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी अक्षय, सुनील आणि परेश रावल 'हेरा फेरी 3' या चित्रपटासाठी मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये बैठक झाली. त्यानंतर आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये आला होता, तर दुसरा भाग 2006 मध्ये आला होता. आता 17 वर्षांनंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हेरा फेरी या चित्रपटात बाबू भैय्या ही भूमिका परेश रावल यांनी साकारली तर श्‍याम ही भूमिका सुनील शेट्टीनं साकारली आहे. चित्रपटात राजू ही भूमिका अक्षयनं साकारली आहे. 


काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ''हेरा फेरी', 'अंदाज अपना अपना' या चित्रपटांचे सिक्वेल कधी रिलीज होणार? या सिक्वेलनमध्ये काम करण्यासाठी तुम्ही किती एक्सायडेट असाल?' या प्रश्नाला परेश यांनी उत्तर दिलं, 'मला जर पुन्हा धोती आणि चष्मा घालून तशी भूमिका करावी लागली तर मी फक्त पैशांसाठी एक्सायडेट असेल, त्यापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टींसाठी एक्सायडेट नसेल.' 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hirve Hirve - Phulrani:  'हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे...'; बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात