Shah Rukh Khan : किंग खानच्या पठाण (Pathaan) सिनेमाची सगळीकडे हवा आहे. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) तब्बल 4 वर्षांनी पठाण सिनेमातून कमबॅक केलं आहे. नुकताच या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा सुद्धा पार केला आहे. अशातच शाहरुख सध्या त्याच्या सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह झाला आहे. सध्या एसआरकेच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला असून ज्याची चर्चा होते.
त्याचं झालं असं की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या जिजस अँड मेरी कॉलेजच्या कॉमर्स डिपार्टमेंटचं हा व्हिडीओ आहे. यामध्ये कॉलेजचे प्रोफेसर विशेषतः शिक्षिका आणि त्यांचे विद्यार्थी एकत्र नृत्य करताना दिसत आहेत. झुमे जो पठाण या गाण्यावर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यासोबत ताल धरला आहे आणि साडीमध्ये या सगळ्या शिक्षिका नृत्य करताना दिसत आहेत.
स्वतः शाहरुखने या व्हिडीओची दखल घेतली असून ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन त्याने हा व्हिडीओ शेअर करुन त्या शिक्षकांचं कौतुक तर केलंच शिवाय आभार सुद्धा मानले आहेत. त्याने लिहिलं की, "असे शिक्षक आणि प्रोफेसर मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे, जे विद्यार्थ्यांना शिकवतात आणि मुलांसोबत धमाल सुद्धा करतात. एज्युकेशन रॉकस्टार आहेत हे सगळे!"
या व्हिडीओची सध्या खूप चर्चा होत आहे. नेटकाऱ्यांनी या शिक्षकांचं आणि मुलांचं खूप कौतुक केलं आहे. पठाणच्या रिलीजनंतर शाहरुखच्या करिअरची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. त्याच्या झीरो या सिनेमाने विशेष कामगिरी केली नसल्याने त्याच्या कमबॅककडे चाहते आशेने पाहत होते.
पठाणने मात्र चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. YRF प्रॉडक्शनचा हा सिनेमा सध्या सगळ्यांना भुरळ घालत आहे. तब्बल 25 दिवसांनी सुद्धा सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या निमित्ताने किंग खान सोशल मीडियावर सक्रिय झाला असून त्याला चाहते #AskSRK असा हॅशटॅग वापरुन प्रश्न सुद्धा विचारतात. नुकतच एसआरकेने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना मजेदार उत्तरं दिली.
पठाण लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये
पठाण रिलीज झाल्यावर त्याने अनेक रेकॉर्ड मोडून काढले. या सिनेमाने आतापर्यंत 511.42 कोटींची कमाई केली आहे. जगभरात देखील 'पठाण'ची चांगलीच हवा आहे. भारतात हा सिनेमा तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई करेल असं पाहायला मिळत आहे. 'पठाण' या सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातमी
Pathaan Tickets Price : किंग खानची चाहत्यांना खास भेट; आता 'पठाण' फक्त 110 रुपयांत पाहता येणार