Sonu Nigam: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यानं स्वप्नील फातर्फेकर यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert)  धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, सोनूनं स्वप्नील फातर्फेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. आता या प्रकरणावर स्वप्नील फातर्फेकर यांची बहीण सुप्रदा फातर्फेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुप्रदा फातर्फेकर यांनी ट्वीट शेअर करुन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'चेंबूर महोत्सवाचे आयोजक या नात्याने, मला चेंबूर महोत्सव 2023 च्या शेवटी झालेल्या घटनेबद्दल सांगायचं आहे.  सोनू निगमला त्यांचा परफॉर्मन्स देऊन घाईघाईने स्टेजवरून खाली आणले जात होते. माझा भाऊ हा सोनूसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. गर्दी आणि गोंधळामुळे वाद निर्माण झाला. पडलेल्या व्यक्तीला झेन रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले.'

'सोनू निगम सुखरूप आहे. संस्थेच्या टीमच्या वतीने, आम्ही सोनू सर आणि त्यांच्या टीमची या घटनेबद्दल अधिकृतपणे माफी मागितली आहे. कोणत्याही निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका'

ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये  'माझ्या भावाला सोनू निगमसोबत सेल्फी काढायचा होता. तो सेल्फी काढत असताना सोनू निगमच्या बॉडीगार्डसोबत त्याचा वाद झाला. आम्ही नंतर सोनू निगमचीही माफी मागितली. हाणामारीत एक व्यक्ती स्टेजवरून खाली पडला. आम्ही त्याला रुग्णालयात नेले आणि त्यानंतर सोनू निगम पोलिसांकडे गेला. यात राजकारण करण्यासारखे काही नाही.  माझा भाऊ पोलिसांना सहकार्य करेल.'  

सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदाराचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केली अशी माहिती समोर आली. 

संबंधित बातम्या

Sonu Nigam : मुंबईतील कार्यक्रमात सोनू निगमला ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की? मध्यरात्री पोलिसांत तक्रार दाखल