Hemangi Kavi : हेमांगी कवी (Hemangi Kavi) तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हेमांगीने गेल्यावर्षी सोशल मीडियावर लिहिलेली 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट चांगचील व्हायरल झाली. ती पोस्ट काही व्यक्तींना खटकली होती. तर काही व्यक्तींनी हेमांगीचे कौतुक केले होते. आज या पोस्टला एक वर्ष झाल्याने नेटकरी पुन्हा एकदा हेमांगीला ट्रोल करू लागले आहे. त्यामुळे हेमांगीने एक खास पोस्ट लिहित या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
हेमांगीच्या आयुष्यातला 'तमाशा लाईव्ह'
हेमांगीने माझ्या आयुष्यातला 'तमाशा लाईव्ह' म्हणत पोस्ट लिहिली आहे, "माझ्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देत आहेत. टॅग करत आहेत. ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणारदेखील नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही. पण ट्रोलर्सहून अधिक मंडळी मला पाठिंबा देत माझ्याशी जोडले गेले आहेत. खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता".
प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं करीअर हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही : हेमांगी कवी
हेमांगीने पुढे लिहिलं आहे,"मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिला आहे आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. पण नेटकरी मला चांगलच ट्रोल करत आहेत. ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली. मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी अनफॉलो केलं, अनेक हितचिंतकांचे फोन आले. काही सपोर्ट करणारे तर काही भीती दाखवणारे. 'आता तुझं करीअर धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी इमेज आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं करीअर हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही!"
पण हेमांगी मात्र नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला घाबरली नाही पण तिला वाईट नक्कीच वाटलं. तिच्या मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू.
पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटाला संजय जाधव यांचा 'तमाशा Live' सिनेमासाठी तिला कॉल आला आणि दीड दोन महिन्यांचं वर्कशॉप करून सिनेमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आणि आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय".
हेमांगीने मानले संजय जाधवचे आभार
'तमाशा लाईव्ह' सिनेमासाठी विचारणा झाल्यामुळे हेमांगीने संजय जाधव यांचे आभार मानले आहेत. आभार मानत हेमांगीने लिहिलं आहे," दादा, या सगळ्या घटनेनंतर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन. हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप प्रेम".
संबंधित बातम्या