मुंबई : प्रदर्शनापू्र्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या मुश्किली रिलीजनंतरही कमी झालेल्या नाहीत. त्यातच बच्चन कुटुंबीयांनीही करणच्या सिनेमावर बहिष्कार टाकल्याचं चित्र आहे. रणबीर कपूर आणि ऐश्वर्याचे इन्टिमेट सीन्स असल्यामुळे बच्चन कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

'ऐ दिल...' चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चनही प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे बच्चन कुटुंब सूनबाईंना पाहण्यासाठी तरी चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र करणने वारंवार निमंत्रण पाठवूनही बच्चन्सनी याकडे सपशेल पाठ फिरवल्याचं म्हटलं जातं.

रणबीर आणि ऐश्वर्याचे इन्टिमेट सीन्स असल्यामुळे बच्चन कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. करण जोहर बच्चन कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचा मानला जात होता. मात्र आता बिग बी, अभिषेक यांच्यासह श्वेता बच्चन-नंदाही त्याच्यापासून चार हात लांब राहत असल्याचं म्हटलं जातं.

विशेष म्हणजे बिग बींनी सुनेच्या नव्या चित्रपटाबद्दल ट्विटरवर एक अवाक्षरही न लिहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बच्चन कुटुंबातील अमिताभ, जया, अभिषेक आणि आता ऐश्वर्या अशा सर्वांसोबत काम केलेला करण जोहर हा इंडस्ट्रीतला एकमेव दिग्दर्शक आहे. मात्र आता जोहर आणि बच्चन कुटुंबातही दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.