मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’च्या मागील आठवड्यातील दोन्ही शूटिंगला अभिनेत्री उपासना सिंह गैरहजर होती. ‘कॉमेडी नाईट्स’मधील पिंकी बुआच्या भूमिकेमुळे उपासनाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उपासनाने ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ शो सोडून दिल्याची चर्चा आहे. हा शो अभिनेता कृष्णा होस्ट करतो.

 

‘देसीमार्टिनी’च्या वृत्तानुसार, उपासना सिंहने याआधी म्हटलं होतं की, कृष्णा आणि त्याच्या टीमसोबत कॉमेडी नाईट्स लाईव्हमध्ये काम करण्यास काहीही हरकत नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, उपासना सिंहच्या भूमिकेला शोमध्ये ज्याप्रकारे सादर केले जात आहे, त्यावरुन उपासना नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शो सोडण्याचा निर्णय उपासनाने घेतला आहे.

 

तर ‘टेलिचक्कर’च्या वृत्तानुसार, उपासनाला एका कॉन्ट्रॅक्टरवर सही करण्यास सांगितले होते, ज्यात लिहिले असे लिहिले होते की, सोनीवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करणार नाही.

 

याआधी गायक मिका यालाही काही दिवसांपूर्वी ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ सोडण्यास सांगितलं होतं. मिका सिंह गेस्ट म्हणून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाला होता.