Harshvardhan Rane Spoke On Vikrant Massey Retirement: बॉलीवूडमध्ये 12th फेल आणि सेक्टर 36 यांसारख्या चित्रपटांतून अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने अभिनयातून निवृत्ती जाहीर केलं. विक्रांतच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. पण याच सगळ्यावर त्याच्या एका सहकलाकाराने शंका व्यक्त केली आहे. 'हसीन दिलरुबा' सिनेमातील त्याचा सहकलाकार हर्षवर्धन राणेने हा त्याचा पब्लिसिटी स्टंट असू शकतो, असं म्हटलं आहे.
हर्षवर्धन राणेने नुकतीच बॉलिवूड बबलसोबत संवाद साधला. यावेळी त्याने विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीच्या घोषणेवर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, हा एक पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. मला हा विश्वास आहे की, विक्रांत आमिर खानप्रमाणेच सिनेमा पुन्हा करायला लवकरच सुरुवात करेल. हर्षवर्धनच्या या वक्तव्यामुळे विक्रांतच्या एका जवळच्या व्यक्तीनेच त्याच्या निवृत्तीच्या घोषणेवर शंका उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय.
हर्षवर्धनने केलं विक्रांतचं कौतुक
हर्षवर्धनने पुढे विक्रांतंचं कौतुक करत म्हटलं क, तो अतिशय स्वच्छ माणूस आहे. त्याच्या कामाचा मी नेहमीच आदर करतो. मला आशा आहे की, काही चित्रपट निर्मात्यांनी त्याच्यावर लादलेली ही पीआर अॅक्टिव्हिटी आहे. विक्रांतच्या निवृत्तीच्या घोषणेवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याची ही घोषणा ऐकून त्याच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय.
विक्रांत मेस्सीचा अभिनयातून संन्यास
विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय की, "नमस्कार, गेली काही वर्ष आणि त्यानंतरची काही वर्ष खूपच शानदार होती. मी तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण, जसजसा मी पुढे जातो, मला जाणवलंय की, आता रिकेलिब्रेट करणं आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि एका मुलाच्या रुपात आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या 2025 वर्षात आपण शेवटचे एकमेकांना भेटू, जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही... शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद, या दरम्यानच्या सर्व गोष्टींसाठी सदैव ऋणी. ”
ही बातमी वाचा :