गौहरसोबत अफेअरबाबत अभिनेता हर्षवर्धन म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 10:54 PM (IST)
मुंबई: अभिनेत्री गोहर खान आणि अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या डेट करीत असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेनंतर स्वत: हर्षवर्धननं याबाबत माहिती दिली आहे. गौहर खान आणि आपण रिलेशनशीपमध्ये नसल्याचं हर्षवर्धननं म्हटलं आहे. 'सनम तेरी कसम' सिनेमातून हर्षवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गौहरबाबतच्या अफवांविषयी बोलताना हर्षवर्धन म्हणाला की, 'मला ती आवडत नाही असं मी म्हणणार नाही. ती मेहनती आहे. स्वत:च्या हिंमतीवर पुढे जाणारी आणि स्वाभिमानी मुलगी आहे ती. पण याचा अर्थ आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत असा होत नाही.' दरम्यान, गौहरनं अद्याप तरी याबाबत कोणतंही वक्तव्य केलंलं नाही.