Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant:  अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) हा हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता आहे. डॅनियल रॅडक्लिफला हॅरी पॉटर (Harry Potter) फिल्म सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या फिल्म सीरिजमध्ये त्यानं हॅरी ही भूमिका साकारली. हॅरी पॉटरमधील डॅनियलच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. डॅनियल हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. डॅनियल रॅडक्लिफची गर्लफ्रेंड एरिन डार्के (Erin Darke) हिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एरिनचा बेबी बंप दिसत आहे. 


व्हायरल फोटोमध्ये दिसला एरिनचा बेबी बंप 


डॅनियल रॅडक्लिफच्या इन्स्टाग्रामवरील फॅन पेजने काही  डॅनियल आणि एरिनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डॅनियल रॅडक्लिफ आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन डार्क बाहेर फिरताना दिसत आहेत. डॅनियलच्या लेटेस्ट फोटोमध्ये, एरिनचा बेबी बंप दिसत आहे. डॅनियल रॅडक्लिफ म्हणजेच हॅरी पॉटरच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. 






डॅनियल आणि एरिनला नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा 


डॅनियल आणि एरिनच्या व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या फोटोला 'बेबी पॉटर' अशी कमेंट करुन डॅनियल आणि एरिनला शुभेच्छा दिल्या. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'बेबी पॉटर येत आहे.'


डॅनियल आणि एरिन  यांनी या चित्रपटात केलं काम


डॅनियलची गर्लफ्रेंड एरिनही हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक चित्रपट केले आहेत.  2013 मध्ये आलेल्या 'किल योर डार्लिंग्स' या चित्रपटात डॅनियल आणि एरिन या  दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्याचवेळी दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. kill your darlings बरोबरच डॅनियल रॅडक्लिफ आणि एरिन डार्क यांनी  2016 मधील चित्रपट डोंट थिंक ट्वाईस आणि 2021 मधील मिरॅकल वर्कर्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये एकत्र काम केले. गेली अनेक वर्ष डॅनियल आणि एरिन हे एकमेकांना डेट करत आहेत. अजून एरिनच्या डिलेव्हरी डेटबाबत कोणतीही माहिती डॅनियलनं दिलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Ram Charan Birthday Celebration: RC 15 च्या टीमसोबत राम चरणचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव