Har Har Mahadev: हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये केलेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.' अशी प्रतिक्रिया अभिजित देशपांडे यांनी दिली. 


काल घडलेला प्रकार लांच्छनास्पद: अभिजित देशपांडे


हर हर महादेव या चित्रपटातील सीन्सवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र अव्हाड यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल या चित्रपटाचा शो बंद पाडला. या सर्व प्रकरणावर दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


अभिजित देशपांडे म्हणाले,'खरतर आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडला होता. आम्हाला सेन्सॉर बोर्डाने काही प्रश्न विचारले होते त्यावेळी आम्ही संबंधित इतिहासाचे दाखले तिथे दिलेले आहेत. त्यानंतरच आम्हाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे फार काही बोलणार नाही. पण काल लांच्छनास्पद प्रकार घडला. थिएटरमध्ये काही लोकांनी घुसुन चित्रपट बघायला आलेल्या आपल्या मराठी माणसांची मारहाण केली. त्यांना शिविगाण केली. त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे मला वाटलं की मी समोर येऊन आमची बाजू मांडावी. मी या प्रकरणाची निंदा करतो.'


'आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त स्वत:ला म्हणतो आणि जर त्यांचेच विचार समजून न घेता आपण ऐकमेकांवर शिवीगाळ करत राहिलो तर आपण महाराष्ट्राला कुठे ठेवत आहोत? ज्या ज्या पॉइंटवर आक्षेप घेतला जातोय त्याच स्पष्टीकरण आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे दिलेलं आहे. सगळ्या आक्षेपांना आम्ही उत्तर देत बसणार नाही.  पण ऑफिशियल स्टेटमेंट एक आज रिलीज केलं जाईल.' असंही यावेळी अभिजित देशपांडे यांनी सांगितलं. 


पुढे अभिजित देशपांडे म्हणाले, 'तुम्ही एखाद्या चित्रपटगृहात जाऊन तेथील लोकांना मारता हे किती चुकीचं आहे? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.'


'राज्याच्या तमाम जनतेला मला सांगायचं आहे की हा सिनेमा पहा.  जे लोक आक्षेप घेत आहेत त्यांनी हा चित्रपट नक्कीच पहिला नसेल.शनिवार आणि रविवारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.' असं अभिजित देशपांडे  म्हणाले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Har Har Mahadev: 'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार? मनसेकडून आज विवियाना मॉलमध्ये स्पेशल शो