Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav)  यांनी एबीपी माझाला माहिती दिली. 'आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका.' असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले. 


आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका: अविनाश जाधव 
'अमोल मिटकरी यांनी आमच्या अमेय खोपकर यांना सांगितले की, उद्या चित्रपट लावून दाखवा ! त्यासाठी हा शो लावलाय माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ज्या विवियाना मॉलच्या थेअटर पासून एका मिनिटाच्या अंतरावर राहतात. जिथे त्यांनी काल राडा केला त्याच थेटरमध्ये आज आम्ही शो लावलाय. महाराष्ट्र सैनिक टॉकीजमध्ये आहे ज्याला वाटतं त्यांनी राडा करावा. त्यांनी आम्हाला आव्हान दिले आता आम्ही शो सुरू केलाय. आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका.' 


पुढे अविनाश जाधव म्हणाले, 'हे जितेंद्र आव्हाड आम्हाला इतिहास शिकवणार का? पिक्चर पिक्चर सारखा बघा. जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत, सत्ता गेल्यानंतर हेच काम त्यांना आहे. अनेक ठाणेकर आता हा चित्रपट बघायला येणार आहेत. त्यांचं म्हणणे आहे की, काही होऊ द्या मात्र आम्ही चित्रपट बघणार. अडीचशे लोकांचा आम्ही एक शो बुक केला होता तो हाउसफुल झालाय आता आम्ही दुसरा शो बुक करतोय.'


काय म्हणाले परीक्षित दुर्वे? 


काल विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्यामध्ये माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं, परीक्षित दुर्वे यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले त्यांनी शो बंद पाडला हे सगळं ठीक होतं. आमचं मन एकच होता तो शो बंद पाडला त्याचे पैसे आम्हाला परत मिळावे, यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी माझ्यावर माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी तक्रार दाखल केली आहे. आता कायदेशीर कारवाई होईल निषेध तुम्हाला व्यक्त करायचा आहे तर अशा पद्धतीने नाही.'


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Har Har Mahadev: 'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार? मनसेकडून आज विवियाना मॉलमध्ये स्पेशल शो