Vijay Deverakonda Birthday : तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आज (9 मे) त्याचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 9 मे 1989 रोजी हैदराबाद येथे झाला. 'अर्जुन रेड्डी' फेम या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेता विजयने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. देवरकोंडा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही अतिशय मनोरंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


विजयचे कुटुंबीय त्याला 'राऊडी' नावाने हाक मारते. विजयने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 मध्ये रोमँटिक कॉमेडी फिल्म 'नुव्विला'मधून केली होती. पण, 2015 मध्ये आलेल्या 'यवेदा सुब्रमण्यम' या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या दमदार भूमिकेमुळे त्याला मनोरंजन विश्वात खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.



कधीकाळी घरभाड्याचे पैसे नव्हते..


एका मुलाखतीत विजय देवरकोंडा याने स्वतः खुलासा केला होता की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेकवेळा घराचे भाडे देण्यासाठीही विजयकडे पैसे नव्हते. मात्र, या अभिनेत्याने आपल्या मेहनतीने दक्षिण चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.


पहिला पुरस्कार केला दान!


अभिनेता विजय देवराकोंडा याला 'अर्जुन रेड्डी' चित्रपटासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्याने या पुरस्काराचा 25 लाख रुपयांना लिलाव केला आणि संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीला दान केली. 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून विजय देवरकोंडा याला राष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून हक्काची ओळख मिळाली. बॉलिवूडचा 'कबीर सिंह' हा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अभिनेता असण्यासोबतच विजय देवराकोंडा बिझनेसमन देखील आहे. त्याचा 'राऊडी वेअर' नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँडही आहे.


हेही वाचा :